Tuesday, February 26, 2019

Visit to Department of Sociology, Shivaji University, Kolhapur




Professor Dr. Jagan Karade,
Head,
Department of Sociology,
Shivaji University, Kolhapur.
 &
Dr. Pralhad Mane, 
Assit. Professor,
Department of Sociology,
Shivaji University, Kolhapur. 

Guided us on the topic of 'Carrier Opportunities in Sociology'  


 



26 November, Indian Constitution Day

“२६ नोव्हेंबर संविधान' दिनानिमित्त 



         दि.९ डिसेंबर, २०१७ रोजी ‘२६ नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त’ “भारतीय संविधानाची ओळख” या विषयावर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. एम. एल. होणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रा. जॉर्ज क्रुझ यांच्या हस्ते करण्पोयात आले.  
 पोस्टर प्रदर्शन 
भारतीय संविधानाची ओळख’









आजरा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाची
"बाल कल्याण संकुलास" भेट


आजरा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाने ‘जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर’ या संस्थेस अभ्यास भेटीचे आयोजन दि. १३ जानेवारी, २०१८ रोजी केले होते.  या  संस्थेलाच "बाल कल्याण संकुल"  म्हणून ओळखले जाते. 


ही एक बिगर शासकीय संस्था (एनजीओ) संस्था असून बालकल्याणाचे काम करणारी प्रातिनिधिक व आघाडीची संस्था म्हणून लोकमान्यता आणि शासन मान्यता मिळाली आहे. एका दिवसाच्या बालकापासून त्यांचे पालकत्व करणारी संस्था एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे, मुलांना दत्तक पालकत्व मिळवून देणे, संस्थेतील कन्यांचे विवाह, माहेरपण करणे आणि मुलांचे पुनर्वसन करीत आहे.
  सरकारकडून काही प्रमाणात निधी मंजूर केला गेला आहे आणि लोकांकडून मदतीच्या रूपाने प्राप्त होणारा निधी यावरच ही संस्था चालते.  १९४९ साली स्थापन झालेल्या या संस्थेत सुरुवातीला केवळ ४ मुले होती. त्यावेळी संस्थेला ‘रिमांड होम’ म्हणून ओळखले जायचे. गेल्या काही वर्षांपासून संस्थेत प्रचंड वाढ झाली आहे. आता संस्थेचे ८ विभाग आहेत त्यातील सदस्यांची संख्या ४०० च्या वर आहे.   

          निराश्रित महिलांसाठी एक जुनी संस्था कार्यरत होती ती १९९२ साली या संस्थेत विलीन झाली त्यामुळे संस्था विस्तारली. या संस्थेने निराधार महिलांना मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे.     
  

 मुली आणि मुले यांचे पुनर्वसन, शिक्षण, प्रशिक्षण, मुलांना दत्तक घेणे, विवाह, विवाह झाल्यानंतर जबाबदार्या देखील संघटनेद्वारे काळजी घेतली जाते.  1991 मध्ये, "हिंदू अनाथ कल्याण" संघाची स्थापना झाली आणि ती विस्तारित झाली आणि आता त्याचे नाव "बाल संकुल" असे आहे.  


          या अभ्यास भेटीचे आयोजन प्रा. अविनाश वर्धन यांनी केले होते.

Word Population Day



११ जुलै जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन :  

समाजशास्त्र विभाग - नियोजन बैठक २०१७ - १८



आजरा महाविद्यालय, आजरा
समाजशास्त्र विभाग
                                                                                                                 
                                                                                    दि. २१  जुन, २०१७    
 
* नोटीस *

        महाविद्यालयातील बी.ए. भाग १ व २ मधील समाजशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्याना कळविण्यात येते कि, दि.२३ जुन, २०१७ रोजी शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ या वर्षातील ‘समाजशास्त्र विभागाची नियोजन बैठक आयोजित केली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी खोली क्र. १७ मध्ये सकाळी ठीक १०.०० वा. हजर रहावे.    

                                                                                                                 प्रा. अविनाश शि. वर्धन
                                                                                                                समाजशास्त्र विभाग,                 आजरा महाविद्यालय, आजरा

Department of Sociology





दि. १९ जुलै, २०१८     

* नोटीस *

        महाविद्यालयातील बी.ए. भाग १ व २ मधील समाजशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्याना कळविण्यात येते कि, समाजशास्त्र विभागाची शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ ची नियोजन बैठक शनिवार दि.२१ जुलै, २०१८ रोजी रोजी खोली  क्र. १७ सकाळी ठीक १०.०० वा. हजर रहावे.     

प्रा. अविनाश शि. वर्धन
                                                                                                     समाजशास्त्र विभाग,
                                                                                              आजरा महाविद्यालय, आजरा