Tuesday, February 26, 2019


आजरा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाची
"बाल कल्याण संकुलास" भेट


आजरा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाने ‘जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर’ या संस्थेस अभ्यास भेटीचे आयोजन दि. १३ जानेवारी, २०१८ रोजी केले होते.  या  संस्थेलाच "बाल कल्याण संकुल"  म्हणून ओळखले जाते. 


ही एक बिगर शासकीय संस्था (एनजीओ) संस्था असून बालकल्याणाचे काम करणारी प्रातिनिधिक व आघाडीची संस्था म्हणून लोकमान्यता आणि शासन मान्यता मिळाली आहे. एका दिवसाच्या बालकापासून त्यांचे पालकत्व करणारी संस्था एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे, मुलांना दत्तक पालकत्व मिळवून देणे, संस्थेतील कन्यांचे विवाह, माहेरपण करणे आणि मुलांचे पुनर्वसन करीत आहे.
  सरकारकडून काही प्रमाणात निधी मंजूर केला गेला आहे आणि लोकांकडून मदतीच्या रूपाने प्राप्त होणारा निधी यावरच ही संस्था चालते.  १९४९ साली स्थापन झालेल्या या संस्थेत सुरुवातीला केवळ ४ मुले होती. त्यावेळी संस्थेला ‘रिमांड होम’ म्हणून ओळखले जायचे. गेल्या काही वर्षांपासून संस्थेत प्रचंड वाढ झाली आहे. आता संस्थेचे ८ विभाग आहेत त्यातील सदस्यांची संख्या ४०० च्या वर आहे.   

          निराश्रित महिलांसाठी एक जुनी संस्था कार्यरत होती ती १९९२ साली या संस्थेत विलीन झाली त्यामुळे संस्था विस्तारली. या संस्थेने निराधार महिलांना मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे.     
  

 मुली आणि मुले यांचे पुनर्वसन, शिक्षण, प्रशिक्षण, मुलांना दत्तक घेणे, विवाह, विवाह झाल्यानंतर जबाबदार्या देखील संघटनेद्वारे काळजी घेतली जाते.  1991 मध्ये, "हिंदू अनाथ कल्याण" संघाची स्थापना झाली आणि ती विस्तारित झाली आणि आता त्याचे नाव "बाल संकुल" असे आहे.  


          या अभ्यास भेटीचे आयोजन प्रा. अविनाश वर्धन यांनी केले होते.

No comments:

Post a Comment