Monday, June 3, 2019

International Women's Day



आजरा महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

          जागतिक  महिला दिनानिमित्त आजरा महाविद्यालयामध्ये समाजशास्र विभागाच्या वतीने ‘भारतीय समाजशास्त्राच्या विकासात महिला समाजशास्त्रज्ञांचे योगदान’ या विषयावरील भित्तीपत्रिकेचे उद्धाटन जनता एज्युकेशन संस्थेचे सल्लागार प्रा श्री. गो. वा. बांदेकर व वरिष्ठ प्रा. सौ. मीना मंगरूळकर यांच्या शुभ हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना प्रा. मीना मंगरूळकर म्हणाल्या की, “महिलांनी आपल्या प्रत्येक हक्कासाठी लढा दिलेला आहे. जगामध्ये महिलांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी लढे दिले आहेत. आजदेखील आपल्याला दुय्यम दर्जा दिला जातो. आपण अनेक क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले असले तरी सर्वसामान्य स्त्रीपर्यत ‘समानतेचा’ दर्जा प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या आवडत्या क्षेत्रात खूप मोठे प्रयत्न करून उत्तुंग यश गाठण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
          या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. आर. पी. टोपले उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ‘जगातील स्त्रीयांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांनी सर्वच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करून आपले कर्तुत्व सिध्द केले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्त्रियांकडे एक माणूस म्हणून पाहिले पाहिजे.
          
          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कु. गीता मोरबाले यांनी केले तर आभार कु.शुभांगी दोरुगडे यांनी मानले. या प्रंसगी प्रशासकीय प्रमुख श्री.योगेश पाटील, प्रा.डॉ.रणजीत पवार, प्रा.व्ही.के.मायदेव, प्रा.डॉ. आनंद बल्लाळ, प्रा.डॉ.एस. के.चव्हाण आदी प्राध्यापक व मोठ्या संख्यने विद्यार्थी उपस्थित होते.   या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अविनाश वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी केले. 

No comments:

Post a Comment